10th Pass Job | तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळातर्फे विविध पदांसाठी भरती केली जात आहे.
या भरती प्रक्रियेसाठी इयत्ता दहावी उतीर्ण अर्ज करू शकतात. या लेखात भरतीसाठी अर्ज कसा करायचा, शेवटची तारीख काय, याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता लगेच अर्ज भरण्यास तरुणांनी सुरुवात करावी.
एसटी महामंडळ धुळे अंतर्गत शिकाऊ (10th Pass Job ) उमेदवारांची एकूण 256 रिक्त पदे भरली जाणार आहेत. मोटार वाहन मेकॅनिक, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, मोटार वाहन बॉडी फिटर, इलेक्ट्रीशियन, टर्नर अशा विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी 24 मे 2024 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पद आणि जागा किती?
मोटर मेकॅनिक-एकूण 65 जागा
डिझेल मॅकेनिक- एकूण 64 जागा
शीट मेटल वर्कर- एकूण 28 जागा
वेल्डर- एकूण 15 जागा
इलेक्ट्रिशियन- एकूण 80 जागा
टर्नर- एकूण 2 जागा
मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनीअर/डिप्लोमा- एकूण 2 जागा
अर्ज कसा करणार?
सदरील भरतीसाठी 33 वर्षे वयोगटापर्यंतचे (10th Pass Job ) उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी एसटी महामंडळाच्या msrtc.maharashtra.gov.in. या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज भरावा.
निवड कशी होणार?
भरतीसाठी अर्ज करण्याची (10th Pass Job ) शेवटची तारीख ही 6 जून 2024 आहे. सर्वप्रथम उमेदवारांची परीक्षा होईल. त्यानंतर मुलाखत आणि कागदपत्रांच्या तपासणीनंतर उमेदवारांची निवड होईल. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन शकता.
News Title – 10th Pass Job in ST Corporation
महत्त्वाच्या बातम्या-
Heat Stroke ते अॅसिडिटीपासून ‘या’ समस्यांवर लाभदायक आहे जलजीरा; जाणून घ्या रेसिपी
ऐश्वर्याच्या ‘या’ सवयीचा श्वेता बच्चनला येतो राग; सर्वांसमोर केला खुलासा
कोल्हापूरातील भयंकर अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर, कारने चौघांना उडवलं
टीम इंडियाला धक्का; ‘या’ स्टार क्रिकेटपटूने घेतली तडकाफडकी निवृत्ती
राज्यातील ‘या’ भागात पाऊस कोसळण्याचा अंदाज, महत्त्वाची अपडेट समोर