नवी दिल्ली | अनेकदा चांगल्या नोकरीसाठी तुम्ही खूप शिकलेलं असणं गरजेचं आहे. त्यानुसारच तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल असं सांगितल जातं. मात्र आता तुमचं शिक्षण फार झालं नाही तरीदेखील तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी (job) मिळू शकते.
भारतीय रेल्वेने पश्चिम रेल्वे अंतर्गत (Indian Railways) अप्रेंटिसची पद भरती निघाली आहे. या भरतीसाठी भारतीय रेल्वेने अर्ज मागितले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर आहे. या पदासाठीचा अधिकृत अर्ज भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
यासाठी तुम्ही wcr.indianrailways.gov.in या वेबसाइटवरुन पात्र उमेदवार अर्ज करु शकतात. या लिंकवर जाऊन भारतीय रेल्वे डब्ल्यूसीआर (WCR) भर्ती 2022 अधिसूचना PDF या लिंकवर क्लिक करुन तुम्ही अधिकृत अधिसूचना पाहू शकता.
या भरतीप्रक्रियेअंतर्गत एकूण 2521 रिक्त पदे भरली जात आहे. यानुसार JBP विभाग, BPL विभाग,कोटा विभाग, WRS KOTA, CRWS BPL, आणि HQ BPL यासह रेल्वेच्या युनिट्स/वर्कशाॅपमध्ये (workshop) भरती केली जाईल.
जेबीपी डिवीजन (JBP Division) मध्ये 884 पदांची भरती केली जात आहे. बीपीएल डिवीजन पदासाठी 614 तर कोटा डिवीजनसाठी 685 पदांची भरती केली जाणार आहे. 158 पद सीआरडब्ल्यूएस तर 20 पद मुख्यालय जेबीपी पदासाठी रिक्त आहेत.
यासाठीचे निकष तुम्ही मान्यताप्राप्त विद्यालयातून 10 वीचे शिक्षण पूर्ण केलेलं असाव. NCVT/SCvt द्वारे जारी केलेल्या अधिसूचित व्यापाराच राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (National Trade Certificate) असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय 15 ते 24 दरम्यान असणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या