दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी

पुणे | राज्य माध्यमिक बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून ९१.४६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ८६.५१ टक्के मुलं उर्तीर्ण झाली आहेत. विभागवार निकालात कोकणाने बाजी मारली असून नागपूरचा क्रमांक सर्वात शेवटी आहे.

पाहा विभागवार निकाल- 

कोकण – ९६.१८ टक्के

कोल्हापूर – ९३.५९ टक्के

पुणे – ९१.९५ टक्के

मुंबई – ९०.०९ टक्के

औरंगाबाद – ८८.१५ टक्के

नाशिक – ८७.७६ टक्के

लातूर – ८५.२२ टक्के

अमरावती – ८४.३५ टक्के

नागपूर – ८३.६७ टक्के

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या