बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दहावीचा निकाल अखेर जाहीर; कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल

मुंबई | कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या वर्षीच्या दहावीच्या परीक्षा राज्य सरकारने रद्द केल्या होत्या. या परीक्षेचा निकाल आज म्हणजे 16 जुलै 2021 ला दुपारी एक वाजता निकाल लागणार आहे. त्याआधी 11 वाजता विभागांचे निकाल जाहिर झाले आहेत. त्यात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे.

सन 2020-21 वर्षातील एसएससीच्या परीक्षेला एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झाली आहे. यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुलं असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी होती. मार्च 2020च्या तुलनेत यंदाचा निकाल 4.65 टक्क्यांनी जास्त लागला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत त्यांचं पास होण्याचं प्रमाण अधिक आहे.

राज्यात यंदाची निकालाची टक्केवारी 99.95 टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी 99.84 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. राज्यात 83 हजार 262 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर 27 विषयांचा निकाल 100% लागला आहे.

दरम्यान, निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी  result.mh-ssc.ac.in वेबसाईटवर जा. त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसबार न दाबता टाईप करावा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पांडुरंगाच्या दर्शनाचा अधिकार नाही”

सरकार टिकवण्यासाठी अजून किती झुकणार?; उद्यानाच्या नामकरणावरून भाजप शिवसेना आमने-सामने

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा झटका!

‘शासन आदेशात एक नाही तर अनेक गोष्टींचा घोळ’; पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

माजी मंत्री ‘संजय राठोड’ यांना पुणे पोलिसांची क्लिन चिट?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More