बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

व्वा पंत! रिषभचा जोफ्रा आर्चरच्या बॅालिंगवर जबरदस्त ‘रिव्हर्स स्वीप’, पाहा व्हिडीओ

अहमदाबाद | टीम इंडियाचा आक्रमक विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात धावांची खेळी केली. पंतने एकूण 23 चेंडूत 2 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने एकूण 21 धावा केल्या. या खेळीदरम्यान पंतने शानदार सिक्स खेचला. पंतने इंग्लडंचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या बाॅलिंगवर ‘रिव्हर्स स्वीप’ मारत हा सिक्स फटकावला आहे.

जोफ्रा आर्चर सामन्यातील चौथी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर पंतने विकेटकीपरच्या डोक्यावरुन ‘रिव्हर्स स्वीप’ मारला. पंतने मारलेला फटका सिक्सर ठरला. पंतने मारलेल्या ‘रिव्हर्स स्वीप’चा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फटक्यासाठी पंतचं जोरदार कौतुक करण्यात येत आहे.

पंतने याआधी इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर अशाच प्रकारे ‘रिव्हर्स स्वीप’ मारला होता. दरम्यान रिषभने मारलेल्या या दोन्ही फटक्याचे व्हिडीओ आता नेटीझन्स शेअर करत आहेत. तसेच पंत ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

दरम्यान, या सामन्यासाठी भारताने रोहित शर्माला विश्रांती दिली आहे. त्यामुळे भारताकडून सलामीला शिखर धवन आणि केएल राहुल सलामीला फलंदाजी करायला सुरुवात केली. तसेच 15 महिन्यांनंतर भुवनेश्वर कुमारने या सामन्यातून भारतीय टी-20 संघात पुनरागमन केले आहे.

थोडक्यात बातम्या –

“मंत्रिपदासाठी पैसे दिलेत, ते वसूल झाल्याशिवाय राजीनामा कसा देईल?”

भारताची खराब सुरुवात; केएल राहूल पाठोपाठ विराट शुन्यावर बाद

“…तर 100 दिवसात पुण्यातील लोकसंख्येचं लसीकरण होऊ शकतं”

2 फुटी असल्याने लग्न जमेना, थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि पोलिसांनाच म्हणाला; मॅडम…

बारामतीचे व्हायरल लावणीसम्राट रिक्षाचालक बाबजी कांबळे यांना थेट चित्रपटात काम करण्याची ऑफर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More