बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून 11 वर्षीय मुलीनं आपल्या आईविरोधातच दाखल केला गुन्हा

नवी मुंबई | सानपाडा सेक्टर-19 मध्ये राहणाऱ्या 11 वर्षीय मुलीने चक्क आपल्या आईविरोधातच पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. हा मारहाणीचा गुन्हा असून सानपाडा पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.

तक्रारदार मुलगी आई-वडील आणि लहान बहिणीसह सानपाडा सेक्टर-11मध्ये राहात आहे. ही मुलगी सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आई विनाकारण मारहाण करत असल्याचा तिचा आरोप आहे.

टीव्ही बंद न केल्यास हँगरने, कंगव्याने तसेच डाव्या गालावर गरम चमच्याने चटके दिल्याचं तिनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.  तसेच एकदा शाळेमध्ये जात असताना आईनं लाथेनं-पट्ट्याच्या सहाय्याने मारहाण केल्याचाही तिचा आरोप आहे.

लहान बहिणीलादेखील आई मारहाण करत असते, असा तिचा आरोप असून वडिलांच्या मदतीने तिने जिल्हा कुटुंब न्यायालयात ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. तक्रारीची माहिती समजल्यावर आईने मला व वडिलांना दमदाटी व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, असं तिनं म्हटलं आहे. पोलिसांनी तिच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

नेत्यानं बंगल्यावर नेऊन मारहाण केली; मनोरुग्ण-निराधार लोकांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेचा आरोप

खासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन

कोरोनापासून बचाव करण्यासाठी ‘या’ 2 गोष्टी सातत्याने करा; आरोग्य मंत्रालयाची नागरिकांना सूचना

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या प्रभावाला केंद्र सरकारच जबाबदार- पृथ्वीराज चव्हाण

दिलदार शेतकरी! आपल्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना घरी जाण्यासाठी विमानाची तिकीटं दिली काढून

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; पाहा तुमच्या भागात किती?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More