बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जेव्हा लोक मला शिव्या देत होते, तेव्हा पवार साहेबांनी मला विरोधी पक्षनेता केलं”

बीड | राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोपीनाथगडावर जात गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर वडील पंडित अण्णा मुंडे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलं. त्यावेळी धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते गोपीनाथगडावर जमले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांचं प्रेम बघून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मी कधी मनातून राजकारण केलं नाही फक्त समाजकारण केलं. मात्र आता मी आज सर्वांसमोर सांगतो की, मी आजपासून मनातून राजकारण करणार, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. जेव्हा लोक मला शिव्या देत होते त्या काळात मला शरद पवार साहेबांनी विरोधी पक्षनेता हे पद दिलं हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही, अशा भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

समाजकारण आणि राजकारणात मी आज उभा आहे. त्यामध्ये जनतेचे मला मिळालेले अभूतपूर्व प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी शिदोरी आहे. मी पाहिलेले स्वप्न म्हणजे सिरसला येथे सुरू होणारी एम.आय.डी.सी आहे आणि या ठिकाणी मी देशातील हवे तेव्हढे उद्योग मी येणाऱ्या काळात आणणार आहे. मी मरेल पण तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं आहे.

दरम्यान, पूर्वीच्या संघर्षाच्या काळात ज्या सहकारी कार्यकर्त्यानी माझी साथ कधीच सोडली नाही. माझी साथ देण्यामुळं त्यांना अडचणीत आणण्यात आलं त्या सर्व कार्यकर्त्याचं माझ्या ह्रदयात स्थान आहे, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले आहेत.

थोडक्यात बातम्या-

राहुल वैद्य आणि दिशा परमारची लगीनघाई; हळद, मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

आषाढी वारी निमित्त मृण्मयी देशपांडेचा मराठमोळा साज, पाहा फोटो!

दिलासादायक! पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा आजची आकडेवारी

मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More