बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन; 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई | ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

काही दिवसांपुर्वी दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती अचानक पुन्हा खालावली होती. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांनी त्यांना पुन्हा रूग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेतला होता.

त्याआधी मुंबईतील नाॅन कोविड रूग्णालय असलेल्या हिंदुजा रुग्णालयात त्यांना 6 जूनला भरती करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर 10 दिवसांपूर्वीचं रूग्णालयातून घरी पाठवण्यात आलं होतं.

दरम्यान, दिलीप कुमार यांच्या दोघा भावांना कोरोनाची लागण झाली होती. एहसान खान आणि असलम खान यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यामुळे दिलीप कुमार यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यांच्या दोन्ही भावांचं नुकतंचं निधन झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

हिवाळी अधिवेशनाची तारिख ठरली; ‘या’ तारखेपासून नागपूरात होणार अधिवेशन

“तुम्ही 19 आमदारांचं निलंबन केलं तेव्हा काय लोकशाहीचं सामूहिक हत्याकांड होतं काय?”

…तर भाजपचे 12 नव्हे, 18 आमदार निलंबित झाले असते- अजित पवार

‘पीक विम्याच्या बीड पॅटर्नमुळे सरकारचा फायदा’; दरेकरांचा गंभीर आरोप

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More