बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुस्लिम आरक्षणासाठी आठवले मैदानात; आज आझाद मैदानात रिपाइंचा एल्गार

मुंबई | सध्या राज्यात मराठा आरक्षणासह ओबीसीच्या राजकिय आरक्षणाचा मुद्दा पेटताना दिसत आहे. सोमवारी विधानसभेत याच संदर्भात मांडण्यात आलेले दोन प्रस्ताव देखील पारित करण्यात आले. तर दुसरीकडे पदोन्नती आरक्षणाचा मुद्दा देखील उभा राहताना दिसतोय. त्यातच आता मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुस्लीम आरक्षणासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे थेट मैदानात उतरले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील चितोडा गावात दलित कुटुंबावर हल्ला गावगुंडांनी हल्ला केला होता. त्यावर रिपब्लिकन पक्षाने आक्रमक भुमिका घेतली होती. पदोन्नती मधील आरक्षण, मुस्लिम समाजाला आरक्षण या मुद्यांवर देखील वारंवार मागणी  करण्यात येत आहे. याच तीन विषयावर आता रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात यावं. मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा कायम पाठिंबा असून मराठा समाजाला आरक्षण मिळणे. ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवण्यात याव्यात. तर, दलित अत्याचार रोखण्याची मागणी, अशा प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण गेलं. सरकार आरक्षण विरोधी सरकार आहे. या सरकारमध्ये आरक्षण विरोधाचा अजेंडा आहे. हा अजेंडा शिवसेनेचा आहे की, राष्ट्रवादीचा ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करावं, अशी मागणी रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्य सरकारविरोधात भाजपचे 12 निलंबित आमदार मागणार न्यायालयात दाद!

निलंबित 12 आमदारांची राजभवनाकडे धाव; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीत काय झालं?

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘संभाजी भिडे’ यांच्यावर गुन्हा दाखल

मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षा आता वर्षातून दोनवेळा होणार!

खासदार नारायण राणेंना दिल्लीतून तातडीने बोलावणं; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राणेंना स्थान?

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More