बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्या शुक्राचार्यांचं पितळ उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही’; नितीन राऊत आक्रमक

मुंबई | सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मुक मोर्चाला सुरवात झाली आहे. तर दुसरीकडे ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा आणि पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. यातच आता ठाकरे सरकारमधील मंत्र्याने पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

पदोन्नतीतील आरक्षण थांबवून अनसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्याविमुक्त जाती आणि बहुजन मागास समाजाला वेठीस धरणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत? असा सवाल राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर या  शुक्राचार्यांचे पितळ उघडे पाडण्याशिवाय राहणार नाही, असा कडक शब्दात इशाराही त्यांनी दिला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे. असं असलं तरी मराठा आरक्षणच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे आणि ते योग्य नाही. ज्यांनी हे चित्र निर्माण केलं आहे, त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही, असंही नितीन राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, ओबीसी, अनुसूचित जाती आणि जमाती, भटक्या विमुक्त जाती यांचं पदोन्नतीतील आरक्षण थांबवले गेलं. याचं समर्थन केलं जाणार नाही. भारतीय राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिलेलं आहे, अशांना ते मिळणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, असा आरोपही  त्यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

पुढचे तीन ते चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आणि आजची शिवसेना कुठे?”

“सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच”

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; पाहा दिलासादायक आकडेवारी

‘कोरोनाच्या संकटातही मैदानात उतरण्यासाठी आतूर’; फिक्सिंगमध्ये सापडलेल्या ‘या’ खेळाडूवरील बंदी बीसीसीआयने हटवली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More