बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

UPSC उमेदवारांची चिंता वाढली; दोन परीक्षा एकाच दिवशी आल्यानं उमेदवारांमध्ये संभ्रम

मुंबई | गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील तसेच देशातील अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. आता कोरोना कमी होत असल्यानं परीक्षा घ्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानंतर आता देशातील आणि राज्यातील परीक्षा घेण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास देखील चालू केला आहे. मात्र, दोन्ही परीक्षेच्या तारखा एकाच दिवशी आल्यानं आता उमेदवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी टीईटी म्हणजेच शिक्षक पात्र परीक्षा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी युपीएससीची पुर्व परीक्षा एकाच दिवशी आली आहे. येत्या 10 ऑक्टोबरला ही परिक्षा घेण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केले आहेत, त्यांना कोणत्यातरी एका परिक्षेला मुकावं लागण्याची शक्यता आहे.

युपीएससीची पुर्वपरीक्षा संपुर्ण देशात घेण्यात येणार असल्यानं राज्य सरकारने टीईटी परीक्षेच्या तारखा पुढे ढकलाव्यात अशी मागणी दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. शिक्षण विभागानं कोणताही विचार न करता परीक्षा जाहीर केल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. गेल्या काही काळापासून भरती प्रक्रिया निघाली नसल्यानं यंदा भरपूर प्रमाणात अर्ज येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या 25 ते 30 हजारांच्या घरात असण्याची शक्यता आहे. तर युपीएससीसाठी 8 लाख उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. राज्यात सध्या 10 लाखांहून अधिक बी.एड धारक विद्यार्थी बेरोजगार आहेत. त्यामुळे शिक्षक पात्र परीक्षा ही या बी.एड झालेल्या विद्यार्थ्यासाठी महत्वाची असणार आहे. आता या सर्व प्रकरणावर राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे उमेदवाराचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबई लोकल सेवा लवकरच सुरू; क्युआर कोडच्या माध्यमातुन प्रवाशांना काढता येणार पास

पीओपी गणेश मुर्तींवर कडक बंदी, चुक कराल तर भराल 10 हजारांचा दंड

मंदिरं उघडण्याचा निर्णय नाहीच?; टास्क फोर्सच्या बैठकीनंतरही कोणती घोषणा नाही!

कोरोनानंतर आता डेंग्यूचा शिरकाव; ‘या’ ठिकाणी वाढतंय संक्रमण

पुण्याला झिका व्हायरसचा धोका?, पुण्यातील ‘इतक्या’ गावांना संभाव्य धोक्याचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More