बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्र्यांना तीन पत्र लिहिली, उद्धव ठाकरे विसरभोळे झालेत की काय?”

मुंबई | गेल्या हंगामात अतिपावसामुळे आणि चक्रिवादळामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तरीही शेतकऱ्यांनी संकटात दिवस काढले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदतीचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही शासनाने मदतीचं आश्वासन पूर्ण केलं नाही. त्यामुळे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपचे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे आमदार समिर कुणावार यांनी पत्र लिहिली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांना तीन-तीन स्मरणपत्र देऊन सुद्धा गेल्या हंगामातील नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. कापूस, सोयाबीनच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदील झालेत. पण वर्ष लोटलं तरिही मुख्यमंत्री शेतकऱ्यांना मदत देत नाही. सध्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत वाईट काळ सुरु आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत, असं समिर कुणावार यांनी म्हटलं आहे.

संकटाच्यावेळी शासनाच्या मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे. उद्धव ठाकरे सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत द्यावी. मी तीन तीन स्मरणपत्र लिहूनही मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरभोळे झालेत का?, असा सवाल आमदार समिर कुणावार यांनी विचारला आहे.

दरम्यान, विधानसभा अधिवेशनादरम्यान भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यावेळी समिर कुणावार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तर आंगणवाडी सेविका, शेतकरी, मजुर आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील त्यांनी सरकारला धारेवर धरलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“मी विधानसभा अध्यक्ष होण्यास तयार, पण शिवसेनेनं वनमंत्रिपद सोडू नये”

टाटा ग्रूपच्या मालकीची टीसीएस कंपनी ‘इतक्या’ हजार फ्रेशर्सला देणार नोकरी!

नाना पटोलेंच्या खुलास्यानंतर फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी होणार; गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मी स्वत: बोलेन, पण ‘हे’ प्रकल्प वेगाने पूर्ण करा- उद्धव ठाकरे

मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार? पालकमंत्र्यांचं सूचक विधान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More