बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताला मिळाला ‘हा’ मोठा मान; पंतप्रधान नरेंद्र मोदी रचणार इतिहास

नवी दिल्ली |  गेल्या अनेक वर्षांपासून भारत जागतिक दहशदवादाचा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत उपस्थित करत होता. माजी दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सर्वप्रथम संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दहशदवादाचा मुद्दा उपस्थित केला आणि दहशदवाद्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल पाकिस्तानला धारेवर धरलं होतं. याचा फायदा आता भारताला होताना दिसत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला मोठा मान मिळाला आहे.

सागरी सुरक्षा, दहशदवाद, आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा या विषयांवर एक महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत. या विषयावर भारत सलग तीन उच्चस्तरीय बैठका होणार आहे आणि त्याचं नेतृत्व भारत करेल. येत्या 9 ऑगस्टला ही वर्च्युअल बैठक होणार आहे.

पहिल्यांदाच एका महत्वाच्या बैठकीत अध्यक्षपदाचा मान हा भारताला मिळाला आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिले भारतीय असतील. त्यामुळे भारताचं हे मोठं राजनैतिक यश मानलं जात आहे. भारत तीन उच्चस्तरीय बैठका घेईल. ज्यात शांतता राखणे, दहशतवादाविरोधात कारवाई आणि सागरी सुरक्षेसारखे गंभीर मुद्दे उपस्थित केले जातील, अशी माहिती संयुक्त राष्ट्रातील भारतीय प्रतिनिधी टीएस तिरूमुर्ती यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षापासून भारताला स्थायी सदस्य देण्याची मागणी केली जात आहे. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य नाही. सुरक्षा परिषदेमध्ये एकूण 15 देशांचा समावेश आहेत. त्यापैकी 10 अस्थायी तर, 5 स्थायी सदस्य आहेत. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहेत. 

थोडक्यात बातम्या-

“मोदीजींच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅस ऐवजी चूल वापरायला लागलेत”

पुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली जाहीर; वाचा काय आहेत नियम

पुणे ग्रामीणमध्ये डेल्टा प्लसचा शिरकाव; नवे बाधित रूग्ण आढळुन आल्याने एकच खळबळ

संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट; ठाकरे सरकारच्या कामावर राहुल गांधी समाधानी

उद्धव ठाकरे आणि संभाजी भिडेंची बैठक, बंद दाराआड झाली चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More