बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय शास्त्रज्ञाची कमाल! 20 दिवसांत तयार केला खिशात बसणारा व्हेंटिलेटर

मुंबई | कोरोनाकाळात अनेकांना कोरोनाने ग्रासलं होतं. कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्यानं आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत होत्या. देशभरात ऑक्सिजन , व्हेंटिलेटर आणि बेडस उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना गमवावं लागलं होतं. परंतू याच कोरोना काळात आरोग्य सुविधा अनेक पटीनं वाढल्या आहेत. तसेच अनेक नवनवीन संशोधन करण्यात आले. असंच एक संशोधन आता देशभरात चर्चेत आलं आहे. एका शास्त्रज्ञाने एक लहान व्हेंटिलेटर तयार केला आहे.

कोलकाताच्या एका शास्त्रज्ञानं अपुऱ्या आरोग्य सुविधाच्या समस्येवर एक पर्याय शोधला आहे. डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी नावाच्या एका इंजिनियरने बॅटरीवर चालणारा एक पॉकेट व्हेंटिलेटर तयार केला आहे. या पॉकेट व्हेंटिलेटरमध्ये दोन यूनिट आहेत, पाॅवर आणि व्हेंटिलेटर, हे दोन्ही मास्कला जोडलेले आहेत. एक बटण दाबताच व्हेंटिलेटर काम करणं सुरू करतं आणि स्वच्छ हवा रुग्णापर्यंत पोहोचवतं.

डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी यांना काही काळापुर्वी कोरोना झाला होता. त्यांची ऑक्सिजन लेवल 88 वर गेली होती. तेव्हा त्यांचं कुटुंबीय त्यांना रुग्णालयात घेऊन जात होते. त्याना कोरोना झाल्यावर व्हेंटिलेटरची गरज पडली होती. काही दिवसात ते कोरोनातून बरे झाले. कोरोना काळात रूग्णांचे हाल पाहून सर्वांना परवडेल असा व्हेंटिलेटर तयार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. त्यानंतर 20 दिवसांतच त्यांनी खिशात मावेल असा व्हेंटिलेटर तयार करून दाखवला.

दरम्यान, विशेष बाब म्हणजे या पॉकेट व्हेंटिलेटरमध्ये एक कंट्रोल नॉबही आहे. याच्या मदतीनं हवेचा फ्लो कंट्रोल करता येऊ शकतो. याचं वजन केवळ 250 ग्रॅम असून हे बॅटरीवर चालतं. आपल्या साध्या पाॅवर बॅकच्या मापाचं हे व्हेंटिलेटर आहे. या व्हेंटिलेटरच्या मदतीनं कोरोना व्हायरसचा प्रसार कमी होईल. रुग्ण आणि डॉक्टरांना दिलासा मिळेल. मुखर्जी यांनी असाही दावा केला आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांसाठी खुशखबर; शहरातील निर्बंधांबाबत अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तासभर खलबतं; भेटीत काय झालं अजित पवारांनी सांगितलं!

‘काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…’; सर्वोच्च न्यायालयाचा परमबीर सिंगांना झटका

अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही, भेटीसाठी घरी येऊ नका- राज ठाकरे

रेल्वे रुळावर बाईक स्टंट करायला गेला अन् अचानक ट्रेन आली, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More