बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लठ्ठपणा असलेल्या लोकांना लाँग कोविडचा धोका अधिक; संशोधनातून नवी माहिती समोर

मुंबई | सध्याच्या काळात फास्ट फुडमुळे भारतात मोठ्या प्रमाणात लठ्ठपणा वाढलेला दिसत आहे. मागील वर्षी आलेल्या एका सर्वे नुसार 60% बालकांमध्ये लठ्ठपणा वाढलेला दिसत आहे. लठ्ठपणामुळे लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. मधुमेह त्याचबरोबर किडणीचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर आता लठ्ठ लोकांना लाँग कोविडचा धोका अधिक असल्याचं समोर आलं आहे.

मध्यम किंवा गंभीर लठ्ठपणाने पीडित लोकांमध्ये कोरोनाला हरवल्यानंतर दिर्घकालिन परिणामांची जास्त जोखीम असते, जे कोरोना रूग्ण लठ्ठ असतात, त्याना लाँग कोरोनाचा धोका जास्त आहे, हा खुलासा अमेरिकेत करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये झाला आहे. हा रिसर्च अलिकडेच डायबिटीज, ओबेसिटी आणि मेटाबोलिज्मच्या ऑनलाइन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

लठ्ठपणाचा संबंध कार्डियो-व्हॅस्कुलर रोग, ब्लड क्लॉटस, आणि लंग्जच्या स्थितीच्या वाढलेल्या जोखीमशी संबंधीत आहे. याशिवाय, लठ्ठपणा इम्यून सिस्टम कमजोर करणे आणि एक क्रोनिक सूजची स्थिती निर्माण करण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळ लठ्ठ लोकांच्या आरोग्यावर कोरोनानंतर देखील गंभीर परिणाम होताना दिसत आहे.

दरम्यान, हृदय, किडनी, व्हॅस्कुलर आणि मेंदूच्या आरोग्याचे मुल्यांकन चाचणीत 35 किंवा त्यापेक्षा जास्त बॉडी मास इंडेक्सच्या रूग्णांमध्ये इम्युनिटी स्पष्टपणे दिसत होती. त्यामुुळे त्याच्या इम्युनिटी क्षमतेत देखील फरक दिसत होता. बेकरी प्रोडक्टस, बर्गर, वडापाव, तळलेले पदार्थ, बटाटा, शाबुदाना, जमिनीखाली उगवलेले कंदमुळं यांसारखे पदार्थ प्रमाणाबाहेर खाल्याने लठ्ठपणा वाढतो.

थोडक्यात बातम्या-

ब्लॅक फंगसपासून वाचायचं असेल तर ‘या’ पदार्थांचं सेवन करू नका; डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

‘कोरोनाची तिसरी लाट आली तरी…’; उद्धव ठाकरेंचा उद्योजकांना सल्ला

‘महागाईच्या भडक्यात बेरोजगारीची लाट, लोकांना काम देण्याची गरज’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

“बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडून टाका सांगितलं होतं, खुर्चीसाठी तुम्ही त्यांचे विचारच गाडून टाकले ”

‘दररोज सामन्यापुर्वी…’; सिक्सर किंग युवराजने दिला भारतीय संघाला मोलाचा सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More