बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तिनं नग्न व्हायला सांगितलं, ते नग्न झाले; पुण्यात 150 पेक्षा जास्त जणांसोबत धक्कादायक प्रकार

पुणे | कोरोना काळात सर्वजण सोशल मीडियाचा अधिक वापर करू लागले आहेत. त्यामुळे घरबसल्या सर्व कामं होऊ लागली. काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे देखील कमवू लागलेत. पण सामान्य माणसांनी ज्या प्रकारे समाज माध्यमांचा वापर केला तसाच वापर हॅकर्सने देखील या काळात केला. त्यामुळे कोरोनाच्या काळात सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या संख्येनं वाढ झाली आहे. आता असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.

लॉकडाऊन काळात घरी असताना पुण्यातील अनेक तरुणांना फेसबुकवर अनोळखी मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. हळूहळू गप्पा झाल्यानंतर थेट व्हाॅट्स अॅप नंबर मागितला. हळूहळू व्हिडीओ कॉलवर देखील बोलणं होऊ लागलं. हळूहळू अश्लिल गोष्टी चालू झाल्या. नंतरच्या काळात त्या मैत्रिणीने तरूणाला नग्न होण्यास सांगितलं. मुलानेही मैत्रिणीच्या म्हणण्यावरून नग्न झाला. त्याच वेळी मैत्रिणीने त्याचा नग्न व्हिडीओ शुट केला.

त्यानंतर काही वेळातच तिनं तो व्हिडीओ थेट त्याच्या व्हाॅट्स अॅपला पाठवला, आणि तरूणाकडे पैशांची मागणी केली. एक दोन नव्हे तर हा प्रकार पुण्यातील 150 तरूणांसोबत घडला आहे. या ट्रॅपमध्ये विषेशतः श्रीमंत तरूणांना अडकवल्याचं समोर आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होण्याची भीती आणि बदनामीमुळे अनेक जण पैसे देऊन मोकळे झाले आहेत.

दरम्यान, याप्रकरणाची पुणे सायबर पोलिसांनी दखल घेतली आहे. पुणे सायबर पोलिसांत या प्रकरणी दोन गुन्हे तर 150 तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलीस दोन आरोपींच्या मागावर असून लॉकडाऊन संपताच दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान येथे कारवाईसाठी जाणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

आता कोरोनाचा पूर्ण नायनाट होणार?; शास्त्रज्ञांनी विकसित केली अँटी व्हायरल थेरपी

जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती

हर्षवर्धन पाटील यांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट; सरकारकडे केली ही महत्वाची मागणी

‘छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा’; ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले हे 3 महत्वाचे निर्णय; पाहा एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More