बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर समर्थकाची आत्महत्या; शातंता राखण्याचं आवाहन

बंगळुरू | कर्नाटक भाजपचे मोठे नेते आणि सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी सोमवारी राजीनामा दिला त्यानंतर आता कर्नाटकात मोठी खळबळ उडाली होती. एका कार्यक्रमात घोषणा केल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे दिला. त्यानंतर त्यांचा राजीनामा राज्यपालांनी मंजुर देखील केला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता कर्नाटकच्या जनतेमध्ये आक्रोश पहायला मिळतोय. त्यातच आता एका येडियुरप्पा समर्थकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं स्पष्ट झालं आहे. अनेक ठिकाणी या निर्णयाचा निषेध केला जात आहे. तर चामराजनगर जिल्ह्यातील बोम्मलपूर गावात राहणाऱ्या एका येडियुरप्पा समर्थकाने आत्महत्या केली आहे. रवि उर्फ रचप्पा असं या समर्थकाचं नाव आहे. तो एका चहाच्या टपरीवर काम करत होता. तर तो येेडियुरप्पा यांचा कट्टर समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे.

समर्थकाच्या आत्महत्येनंतर पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. त्यामुळे पोलिस याप्रकरणाचा आणखी तपास करत आहे. रचप्पावर कर्ज असल्याचं देखील सांगितलं जात आहे. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर तो चिंतेत देखील होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

दरम्यान, या घटनेवर येडियुरप्पा यांनी दुखः व्यक्त केलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याच चढउतार येत असतात. त्यामुळे कोणालाही त्यासाठी आत्महत्या करण्याची गरज नाही, असं येडियुरप्पा म्हणाले. आपला बहुमुल्य जीव गमवण्याची गरज नसल्याचं त्यांनी समर्थकांना सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“…म्हणून भारतीय व्यक्तींचं स्वीस बँकेमधील गौडबंगाल कधी उघडकीस येत नाही”

‘या’ महिन्यापासून लहान मुलांना मिळणार कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना तातडीचं पत्र; केलं ‘ही’ मोठी मागणी

राज्य सरकारचा पूरग्रस्तांना दिलासा; करणार इतक्या हजार कोटींची मदत

‘या’ लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही…; अभ्यासातून चिंताजनक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More