बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 9 हजारांनी वाढ, कोरोनाबळी पुन्हा नऊशेपार

नवी दिल्ली | देशात गेल्या तीन ते चार महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत 9 हजारांची लक्षणीय वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

काल देशात 43,733 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळुहळु कमी कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर काल 47,240 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

देशभरात सध्या 04 लाख 59 हजार 920 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 03 कोटी 06 लाख 63 हजार 665 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. भारतात लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. त्यात आता नवा डेल्टा प्लस व्हायरस आल्याने अजून चिंतेत भर पडली आहे.

देशातील कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशभरात 930 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 04 लाख 04 हजार 211 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलीप कुमार यांचं निधन हे आपल्यासाठी एक सांस्कृतिक नुकसान आहे- नरेंद्र मोदी

‘युसूफ खान ते दिलीप कुमार’; वाचा हिंदी सिनेसृष्टीच्या पहिला सुपरस्टारचा प्रवास

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना सर्वात मोठा दणका!

‘फडतूस माणसांबद्दल मी बोलत नाही’; भास्कर जाधवांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर

विधिमंडळातील हे 12 सदस्य उत्कृष्ट संसदपटू, भाषण पुरस्कारांनी सन्मानित!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More