बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…मग तुमची झोप का उडाली?’; राष्ट्रवादीची शिवसेनेवर खोचक टीका

जळगाव | जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वपक्षातील आमदार चिमणराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मी शिवसेनेत राहू नये, असं अनेकांना वाटतंय, अशी खंत चिमणराव पाटील यांनी व्यक्त केली होती. त्यात आता चिमणराव पाटीलांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गंभीर आरोप करण्यात आला आहे.

चिमणराव पाटील यांचा एक पाय सध्या शिवसेनेत व एक पाय भाजपमध्ये असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सतिश पाटील यांनी केला. गुलाबराव पाटील यांचं काम राष्ट्रवादीला आक्षेपार्ह वाटत नसताना त्यांच्याच पक्षाचे आमदार चिमणराव पाटील यांना ते का आक्षेपार्ह वाटतं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेत वेगळे चित्र दिसतेय. जिल्हा परिषदेतील सदस्य डॉ. हर्षल माने यांची शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर तुमची झोप का उडाली?, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिवसेनेवर देखील खोचक टीका केली आहे. त्या सर्व प्रकरणामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पुन्हा वाद उद्भवणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गुलाबराव पाटलांना माझं या भागातील वर्चस्व सहन होत नाही. याच कारणाने 2014च्या विधानसभा निवडणुकीत माझा ठरवून पराभव करण्यात आला. मला पक्षांतर्गत डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी शिवसेनेत राहू नये असं अनेकांना वाटतं, असा गंभीर आरोप चिमणराव पाटील यांनी केला होता.

थोडक्यात बातम्या-

“हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी राफेल डीलवर पत्रकार परिषद घ्यावी”

“विरोधकांनी महाराष्ट्रातील उत्तम कामगिरीबद्दल ठाकरे सरकारचे आभारच मानायला हवेत”

पावसाळी अधिवेशनाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोडली ‘ही’ परंपरा

“भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केलं तरी सत्तेचा सोपान त्यांना पार करता येणार नाही”

स्वत:ला हिंदू नाही तर भारतीय म्हणा, सगळ्यांचा DNA एकच- मोहन भागवत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More