बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…ही तर शहिद तुकाराम ओंबळे यांच्या अतुलनीय कामगिरीची अवहेलना”

सातारा | 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईत मोठा दहशदवादी हल्ला झाला होता. या दहशदवादी हल्ल्यात 300 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. दहशदवाद्यांकडे ए के 47 सारख्या बंदुका असताना देखील मुंबई पोलिसांनी मोठ्या शौर्याने दहशदवाद्यांशी सामना केला. या चकमकीत छातीवर 23 गोळ्या झेलून अजमल कसाब या दहशदवाद्याला पकडताना तुकाराम ओंबळे शहिद झाले. त्यांच्या या अतुलनीय कामगिरी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या मुळगावी त्यांच्या स्मारक बनवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून आता राजकारण होताना दिसत आहे.

तुकाराम ओंबळे यांच्या पराक्रमामुळे सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील केडंबे हे छोटेशे गाव देशात प्रसिध्द झालं. त्यांच्या जन्मगावी केडंबे येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली. परंतू 13 वर्षानंतर देखील स्मारकाचं काम झालं नाही. स्मारकाच्या निधी देण्यावरून वेगवेगळ्या सरकारमध्ये भिन्नता दिसून आल्यानं याचं काम रखडलं आहे. त्यातच आता ठाकरे सरकारच्या निधीवाटपावरून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टीका केली आहे.

शहीद तुकाराम ओंबळे यांच्या नियोजित स्मारकासाठी 10 कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय यापूर्वीच्या बैठकीत झाला होता. त्यानंतर देखील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समवेत नुकत्याच झालेल्या बैठकीत स्मारकासाठी 5 कोटी रूपयांच्या निधीची घोषणा केली, हे हास्यास्पद असून शहीद ओंबळेंच्या अतुलनीय कामगिरीची अवहेलना करणारं आहे, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

दरम्यान, नेचरलिस्ट ध्रुव प्रजापतीने महाराष्ट्रात कोळ्याच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. पोलीस शहीद तुकाराम ओंबळे यांचं नाव या दोन कोळ्याच्या प्रजातींना देण्यात आलं आहे. दोन कोळ्यांचं शास्त्रीय नामकरण Icius tukarami असं करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

शनाया कपूरचा हॉट अंदाज; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे- रामदास आठवले

‘इतके’ कोरोना रुग्ण सापडल्याने सुनिल शेट्टींची इमारत सील!

“राज्यात आघाडी सरकारला धोका नाही, सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करेल”

सहकार खातं शहांकडे गेल्याने घाबरण्याचं कारण नाही- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More