बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुम्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या गप्पा मारताय?’; संजय राऊत आक्रमक

नवी दिल्ली | गेल्या कित्येक वर्षांपासून आसाम आणि मिझोराम या दोन राज्यात वाद सुरू आहे. त्यात सोमवारी पुन्हा ठिणगी पडली. आसाम आणि मिझोराम यांच्यात झालेल्या संघर्षात आसाम पोलिसांचे 5 पोलीस शहिद झाले. तर एका नागरिकाचा देखील मृत्यु झाला आहे. त्यानंतर आसाम सरकारने आक्रमक भूमिका घेत राजकीय शोकाची घोषणा केली. हा वाद आता दिल्लीत पोहोचला आहे. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

दोन राज्यांचे पोलीस एकमेकांवर बंदुका रोखून आहेत. सीमेवर रक्तपात सुरू आहे. दोन्ही राज्यात अराजकता निर्माण झाली आहे. आणि हे सर्व आपल्या देशात सुरू आहे. तुम्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या गप्पा मारता ?,असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. एक राज्य दुसऱ्या राज्यात जाऊ नका सांगण्याची वेळ येतीय, हे भयावह आहे, असंही राऊत म्हणाले.

मिझोराम हे शांततेशीर राज्य आहे. तर आसाम संवेदनशील राज्य आहे. केंद्राने बाकी सर्व प्रश्न बाजूला ठेऊन हा प्रश्न आधी सोडवला पाहिजे. ही हिंसा म्हणजे सरकारचं अपयश आहे, अशी टीका संजय राऊतांनी केंद्र सरकारवर केली आहे. केंद्र सरकरारने जम्मु काश्मिरचा प्रश्न सोडवला. मग हा प्रश्न का सोडवला नाही?, असा प्रश्न देखील राऊतांनी विचारला आहे.

दरम्यान, सध्या पेगॅससच्या मुद्यावर काँग्रेस आणि इतर 14 विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे संसदेचं कामकाज दररोज तहकूब करावं लागत आहे. त्यातच आता आसाम आणि मिझोरामचा मुद्दा संसदेत देखील पेटण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

बाॅक्सिंगमध्ये भारताचं पदक निश्चित; लवलीना बोर्गोहेनची दमदार कामगिरी

“ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर….”

पुणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून सुरु होऊ शकते मेट्रो

नव्या कोरोना व्हायरसचं रहस्य उलगडलं; ‘माणसाच्या शरिरात गेल्यावर…’

नोकरीची बातमी | 1 लाख भारतीयांना ‘ही’ दिग्गज आयटी कंपनी देणार नोकरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More