बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अशी असेल मराठा क्रांती मुक आंदोलनाची रूपरेषा; वाचा सविस्तर माहिती

कोल्हापूर | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी आज महाराष्ट्रात मराठा क्रांती मुक आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला आता वंचित बहुजन आघाडीने देखील पाठिंंबा दर्शवला आहे. कोल्हापूरातील शाहू समाधी स्थळापासून या मोर्चास सुरुवात होणार आहे. सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरूवात होणार आहे.

खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनापुर्वी आंदोलनाची रूपरेषा मराठा समाजासाठी आखून दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पर्याय शोधून मराठा समाजाचे आरक्षण पूर्नप्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्य सरकारसोबत केंद्र सरकारचीही आहे. या भुमिकेवर मराठा समाज ठाम असून या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना बोलते करण्याचे आंदोलन समाजाने छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात हाती घेतले आहे.

कोल्हापुरनंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही आंदोलनाची मशाल जाणार आहे. नाशिक, औरंगाबाद, अमरावती, आणि कोकण असे पहिल्या टप्प्यात आंदोलन असणार आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य नाही केल्या तर त्यानंतर पुणे लालमहाल ते मुंबई विधान भवन लाँग मार्च होणार आहे. पहिल्या टप्प्यातील ज्या जिल्ह्यात आंदोलन होईल, त्यानंतर तिथेच लाँग मार्चच्या तयारी संदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडेल.

काळ्या रंगाची वेषभुषा परिधान करून दंडावर काळी फीत बांधून येणे. काळा मास्क वापरणे. No Mask No Entry असा गणवेश घालूनच मराठा आंदोलकांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन काळी छत्री, sanitizer सोबत ठेवून त्याचा वापर करणे, आंदोलनस्थळी आपल्यामुळे इतरांना त्रास होईल, असे कोणतेही वर्तन न करणे, कोरोनाचे नियम कसोशीने पाळणे, अशी सक्त ताकीद समन्वयकांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

आज कोल्हापूरातुन मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात; वाचा आंदोलनाच्या प्रमुख 11 मागण्या

वर्ल्ड टेस्ट फायनलसाठी भारताच्या 15 शिलेदारांची फौज सज्ज; दोन द्विशतकं करणाऱ्या खेळाडूला वगळलं

‘सुशांतने 10 वाजून 10 मिनिटांनी…..’; एक वर्षभरानंतर समोर आलं सुशांतच्या मृत्यूचं कारण

सोन्या-चांदीचे भाव पुन्हा उतरले, वाचा आजचे ताजे दर

“भाजप आणि आरएसएसने श्रीरामांच्या नावावर वर्गणी गोळा करण्याचा धंदा चालवलाय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More