Girl Terrorist - घातपाताचा कट रचणाऱ्या पुण्यातील विद्यार्थिनीला अटक
- देश

घातपाताचा कट रचणाऱ्या पुण्यातील विद्यार्थिनीला अटक

पुणे | प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट रचणाऱ्या पुण्यातील युवतीला काश्मीरमधून अटक केल्याची माहिती आहे. सादिया अन्वर शेख असं या 18 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव आहे. 

जम्मू पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांना एक पत्र पाठवलं होतं. पुण्यातील एक युवती आयसिसच्या संपर्कात असून प्रजासत्ताक दिनी घातपात घडवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. 

पुणे पोलिसांनी यासंदर्भात येरवडा येथे राहणाऱ्या तिच्या पालकांची भेट घेतली होती. मात्र आपली मुलगी कुठं गेली हे त्यांनाही माहीत नव्हतं. अखेर तिला काश्मीरमधून अटक करण्यात आलीय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा