बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कडक मुख्यमंत्री धडक निर्णय; आंध्रात टॅक्सीचालकांना मिळणार प्रत्येकी 10 हजार रुपये!

हैदराबाद | टॅक्सी चालक आणि कॅब चालकांना प्रत्येकी 10 रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी केली आहे.

जगमोहन रेड्डी यांनी या योजनेला वायएसआर वाहन मित्र योजना असं नाव दिलं आहे. या योजनेमुळे आंध्र प्रदेशमधील 2 लाख 62 हजार 495 टॅक्सी आणि कॅब चालक-मालक यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

आंध्र प्रदेशमधील 2 लाख 62 हजार 495 टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांना या योजनेमुळे  आर्थिक मदत मिळणार आहे. चालकांना लॉकडाऊनच्या काळात उदरनिर्वाह करण्यास मदत व्हावी म्हणून हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.

कोणत्याही ऑटो चालक, टॅक्सी चालक किंवा मॅक्सी चालकाला खासगी सावकारांकडून प्रचंड व्याजदराने कर्ज घेण्याची वेळ येणार नाही किंवा त्यांना त्यासाठी भाग पाडलं जाणार नाही यासाठी आम्ही त्यांना आश्वस्त करतो. त्यासाठीच आम्ही ही योजना आणली आहे, असं जगमोहन रेड्डी यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

केरळात गर्भार हत्तीणीचा मृत्यू; भाजप नेत्या मेनका गांधी राहुल गांधींवर संतापल्या

अत्यावश्यक सेवेसाठी केंद्राने मुंबईत लोकल सुरू करावी; आव्हाडांची मागणी

महत्वाच्या बातम्या-

“राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी सार्वजनिक कार्यक्रम नको, मात्र ही एक गोष्ट करा”

“तुम्ही कोरोनाचा आलेख खाली आणायचा सोडून अर्थव्यवस्थेचाच आणला”

मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात; रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More