sanjay raut - सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- राऊत
- महाराष्ट्र, मुंबई

सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- राऊत

मुंबई | धर्मा पाटील यांची आत्महत्या नाही तर हत्या आहे, याप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलीय. 

सरकारला विकास हवा आहे, मात्र शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नाहीये. मंत्रालयाच्या दारात जर शेतकऱ्यांचे मृत्यू होत असतील तर असा विकास नको, असं ते म्हणाले. 

दरम्यान, 3 वर्षात 3 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. सरकार एजंटगिरी रोखण्यात अपयशी ठरलं, असा आरोपही संजय राऊत यांनी केलाय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा