बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चेन्नई संघाला मोठा धक्का! कर्णधार धोनीचा CSK ला गुडबाय?; भारताच्या माजी खेळाडूचा खुलासा

मुंबई | भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनी याचं नाव घेतलं जात. धोनी सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग या संघाकडून खेळतो. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून धोनी चेन्नई संघाकडून खेळत आहे. मागील काही वर्षांपासून धोनी चेन्नईला गुडबाय करेल अशी चर्चा क्रिकेट विश्वात रंगली होती. त्यानंतर आता भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि सध्या समालोचक आकाश चोप्रा यांने मोठा खुलासा केला आहे.

चेन्नई कायमच धोनीला आपल्यासोबत ठेवण्यासाठी तयार आहे. आज देखील भरपूर तेवढे पैसे धोनीसाठी मोजायची तयारी देखील चेन्नईची आहे. परंतू मला विचाराल तर, पुढील तीन वर्षे तो संघाबरोबर राहणार नाही, असा दावा आकाश चोप्रा यांनी केला आहे. आकाश चोप्रा स्वतः धोनीचा मोठा चाहता आहे. त्याचसोबत धोनी आणि चोप्रा दोघे चांगले मित्र देखील आहेत.

धोनी आपला निर्णय कधी उघड करत नाही असं सांगितलं जातं. मागील वर्षी देखील त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय अचानकपणे सांगितला होता. धोनीचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेकांनी भारतीय संघाबद्दल चिंता देखील व्यक्त केली होती.

दरम्यान, याआधी देखील आकाश चोप्रा यांनी धोनीवर भाष्य केलं होतं. पुढच्या वर्षी आयपीएलसाठी लिलाव झाला तर चेन्नईने धोनीला सोडून द्यावं, असं आकाश चोप्रा म्हणाला होता. चेन्नईने धोनीला सोडून दिल्यास पुन्हा खेळाडू अदलाबदल प्रक्रियेत त्याला संघात परत घेण्याचा पर्याय असणार आहे. त्यामुळे चेन्नईने धोनीला सोडणं योग्यच ठरेल असं आकाश चोप्रा म्हणाला होता.

थोडक्यात बातम्या-

लसीकरण करताना दोन वेगवेगळ्या कंपनीचे डोस घ्यावेत का?; डाॅक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला

मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले; तुफान हाणामारीत मनसे नेते प्रविण मर्गज जखमी

गणेश नाईकांनी सांगितला कोरोनावरील प्रभावी उपाय, म्हणाले…

ब्लॅक फंगसनंतर आता या नवीन बुरशीजन्य आजाराचा धोका; 8 रुग्ण सापडल्यानं खळबळ

“सरकारला काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या मेव्याचा हेवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More