बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फक्त 6 रुपये घेऊन मुंबईत आला, मात्र त्यानंतर ‘मिस्टर बजाज’ने गाजवली बाॅलिवूड इंडस्ट्री

मुंबई | ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून सर्वांच्या मनात स्थान निर्माण करणारा मिस्टर बजाज एकीकाळी त्याच्या आयुष्याचा खडतर प्रवास करत होता. आपल्याला अभिनेता बनायचं असल्याचं ठरवून मुंबईला निघालेल्या रोनित राॅयकडे त्यावेळी फक्त 6 रुपये होते.

घर सोडून आल्यानंतर दिग्दर्शक सुभाष घई यांनी रोनितला त्यांच्या घरी रहायला सांगितलं होतं. तसेच अभिनेता बनण्यासाठी प्रचंड मेहनत देखील घ्यावी लागेल असं सुद्धा सांगितलं होतं.

रोनितला अभिनयात संधी न मिळाल्याने त्याने हाॅटेलमध्ये नोकरी केली. तिथं त्याने साफसफाई पासून भांड्या धुण्यापर्यंत सर्व काम केली. या सर्व कष्टानंतर ‘जान तेरे नाम’ या चित्रपटात रोनितला काम मिळालं. यावेळी त्याने बाॅलिवूडमध्ये प्रवेश केला.

‘जान तेरे नाम’ हा चित्रपट फारसा काही हिट झाला नाही. मात्र रोनित चाहत्यांमध्ये गुंतला. त्यानंतर रोनितने छोट्या पडद्दावरील ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत काम केलं. या मालिकेतून त्याने प्रसिद्धचं शिखर गाठलं.

‘कसौटी जिंदगी की’ मालिकेनंतर रोनितने ‘क्राईम पेट्रोल’ शो होस्ट केला, तसेच ‘अदालत’ यासारख्या अनेक मालिका तसेच मोठ्या चित्रपटांमध्ये देखील रोनितने काम केलं.

थोडक्यात बातम्या-

आर्यन खानच्या जामीनाबाबत ‘ही’ मोठी माहिती आली समोर

महाराष्ट्र बंद: ठाण्यात रिक्षाचालकांवर शिवसैनिकांची दादागिरी, पाहा व्हिडीओ

‘…मग मनसेचा हत्येला पाठिंबा आहे का?’; नवाब मलिक गरजले

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार? अरेस्ट वॉरंटसह सीबीआय देशमुखांच्या घरी

‘फक्त शाहरूख खानवर निशाणा साधला जातोय’, आर्यन खान प्रकरणी दोन ज्येष्ठ पत्रकारांमध्येच जुंपली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More