बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जलतरणपटू सुयश जाधवने महाराष्ट्राची मान आणखी उंचावली; रोहित पवारांकडून कौतुकाची थाप

मुंबई | शारिरिकदृष्टया अपंग असलेल्या व्यक्तींसाठी जागतिक स्तरावर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा घेतली जाते. यंदाही ही पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा जपानच्या राजधानी टोकियो या शहरात होणार आहे. येत्या 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे. मात्र, कोरोनाच्या संकटात ही स्पर्धा होणार की नाही या बद्दल अद्यापही अनिश्चितता आहे. परंतू या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या पॅराजलतरणपटू सुयश जाधवने महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

टोकियोत होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा सुयश जाधव हा मराठमोळा खेळाडू पात्र ठरला आहे. शारिरिक अपंगत्व असताना देखील सुयशने मोठ्या जिद्धीने मेहनत घेऊन पोहण्याचा सराव केला. अपंगत्व असल्यानं त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. मुळचा माळशिरस तालुक्यातील असलेल्या सुयशचं ऑलिम्पिक पदक मिळवण्याचं स्वप्न आहे.

मराठमोळ्या सुयश जाधवची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. त्याला टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये त्याला सुयश लाभो, यासाठी त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा!, असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. 2020 मध्ये त्याला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

दरम्यान, कोरोनाच्या संकटात ही पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा होणार की नाही या बद्दल अद्यापही अनिश्चितता आहे. भारतीय खेळाडू ऑलिम्पिकसाठी पुर्ण तयार आहे. त्यामुळे आता सुयश जाधव सारख्या खेळाडूनं जागतिक स्तरावर महाराष्ट्राचं नाव मोठं करावं अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या-

लसीकरण करताना दोन वेगवेगळ्या कंपनीचे डोस घ्यावेत का?; डाॅक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला

मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले; तुफान हाणामारीत मनसे नेते प्रविण मर्गज जखमी

गणेश नाईकांनी सांगितला कोरोनावरील प्रभावी उपाय, म्हणाले…

ब्लॅक फंगसनंतर आता या नवीन बुरशीजन्य आजाराचा धोका; 8 रुग्ण सापडल्यानं खळबळ

“सरकारला काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या मेव्याचा हेवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More