बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यासह तब्बल 12 आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी

नवी दिल्ली | मेघालयात काँग्रेसला ( Indian National Congress)  मोठा दणका बसला आहे. मेघालयमधील चक्क 12 आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अर्थातच तृणमुल काँग्रेसचं पारड तर जडं झालं आहे. मात्र काँग्रेसचं मोठ नुकसान झालं आहे. या 12 आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांचाही समावेश आहे. त्यामुळे आता मेघालयात (Meghalaya ) काँग्रेसमध्ये 18 पैकी केवळ 6 आमदार राहिले आहेत.

मागील अनेक दिवसांपासून मुकुल संगमा (Mukul Sangama) हे पक्षश्रेष्ठींवर नाराज होते. व्हिन्सेंट एच. पाला यांना मेघालय काँग्रेस कमिटीचे प्रमुख बनवल्यावरून ही नाराजी होती. त्यानंतर महिन्याभरातच मुकुल संगम यांनी 12 आमदारांना सोबत घेत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी मुकुल संगम नाराज असल्याचं समजताच त्यांची आणि व्हिन्सेंट एच. पाला यांची भेट घेऊन समजुत घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा फारसा काही फरक पडला नसल्याचं दिसून येत आहे.

तृणमुल सध्या पक्षाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. फक्त मेघालयच नाही तर इतरही राज्यात तृणमुलने काँग्रेस नेते आपल्याकडे वळवून घेतल्याचं सांगण्यात येतंय. गोव्यामधून काँग्रेस नेते लुइझन फ्लुरिओ यांनी तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हरियाणातही तिच परिस्थिती पहायला मिळाली आहे. हरियाणातून काँग्रेस नेते अशोक तंवर यांनी देखील तृणमुलमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, एकंदरीतच तृणमुलच्या पक्षविस्ताराच्या प्रयत्नाला यश मिळताना दिसत आहे. सध्या 12 आमदारांच्या प्रवेशामुळे तृणमुल हा राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष बनला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दोन तृतीयांश संख्याबळाची पूर्तता केली असल्याने पक्षबदलानंतरही या आमदारांच्या आमदारकीला कोणतीही भीती राहणार नाही. त्यामुळे एकंदरीतच तृणमुल काँग्रेस (Trunmul Congress) सध्या काँग्रेसवर हावी होताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या- 

“शरद पवार तो काळ गेला”; ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा पवारांना इशारा

एकेकाळी होती राहुल गांधींसोबत लग्नाची अफवा, आता केला भाजपमध्ये प्रवेश

“सरकारचा निर्णय मान्य आहे का?, सदाभाऊ आणि पडळकरांची फसवणूक झाली”

‘रात्रीस खेळ चाले’तून शेवंताची एक्झिट, जाता जाता सांगितले सिनेसृष्टीतले काळे कारनामे

“ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता पण पाटलांच्या मुलांची नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More