आयपीएल हंगामा: हे 12 खेळाडू झाले सर्वाधिक मालामाल!

बंगळुरु | आयपीएल 2018 पूर्वी पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात अनेकांचं नशीब उजळलं. कित्येक जण क्षणात करोडपती झाले तर अनेकजण लखपती झाले. मात्र यामध्ये खालील 12 खेळाडू सर्वाधिक मालामाल झाले. 

बेन स्टोक्स सगळ्यात महागडा खेळाडू ठरला त्याला 12.5 कोटी रुपये मोजून राजस्थाननं आपल्या संघात घेतलं. तर त्यानंतर भारताच्या जयदेव उनाडकटला राजस्थाननंच 11.5 कोटी रुपये मोजले. मनिष पांडेसाठी बंगळुरुनं तर के.एल राहुलसाठी पंजाबनं 11 कोटी मोजले.

कोलकात्यानं क्रिस लीनसाठी 9.6 तर तर मिशेल स्टार्कसाठी 9.4 कोटी मोजले. ग्लेन मॅक्सवेलला दिल्लीनं तर राशीद खानला हैदराबादनं 9 कोटींना खरेदी केलं. क्रुणाल पांड्यासाठी मुंबईनं 8.8 कोटी मोजले. संजू सॅमसनसाठी राजस्थाननं 8 कोटी, केदार जाधवसाठी चेन्नईनं 7.8 कोटी तर अॅड्रू टायसाठी पंजाबनं 7.2 कोटी रुपये मोजले.