बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुजरातमधील कोविड सेंटरला आग, 12 लोकांचा होरपळून मृत्यू!

गांधीनगर | गुजरातमधील भरुच येथील कोव्हिड केअर रुग्णालयाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहेत. ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

पटेल वेलफेअर रुग्णालयात रात्री जवळपास 12.30 वाजता ही दुर्घटना घडली. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण आयसीयू वॉर्ड यात जळून खाक झाला. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

भरुच जिल्ह्यातील पटेल रुग्णालयातील कोरोनाबाधितांसाठी कोव्हिड सेंटर सुरु करण्यात आलं आहे. या कोव्हिड सेंटरमधील आयसीयूमध्ये शॉटसर्किट झाल्याने आग लागल्याचं कळतंय. दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक रुग्ण हे गंभीर जखमी झाले आहे.

अग्निशमन दलाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. जखमी झालेल्यांना सिविल, सेवाश्रम, जंबूसर अल मेहमूद रुग्णालयांसह इतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मला रडू येतंय आणि मला झोप येत नाहीये, आमदार असल्याची लाज वाटतीये”

चक दे पट्टे! विराट कोहली, मॅक्सवेल आणि डिव्हिलियर्सला बाद करत हरप्रीतने फिरवला सामना, पाहा व्हिडीओ

ये नया पंजाब है! पंजाबने विराटच्या बंगळुरूचा केला पराभव

मास्कसंदर्भात नव्या सूचना, प्रत्येकाला ‘या’ सूचना माहितच असायला हव्यात!

“केंद्राने दुजाभाव केला असता, तर लसीकरणात राज्य आघाडीवर असतं का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More