चहावाल्याची ‘ती’ अफवा जीवावर बेतली; क्षणात होत्याचं नव्हतं झालं, 13 जणांचा चिरडून मृत्यू

12 Passengers Killed After Jumping Off Moving Pushpak Express accident Near Jalgaon

Pushpak Express Accident | जळगावजवळील (Near Jalgaon) परधाडे (Pardhade) रेल्वे स्टेशनजवळ (Railway Station) बुधवारी (Wednesday) सायंकाळी चारच्या सुमारास एक भीषण रेल्वे अपघात (Pushpak Express Accident) घडला.

धावत्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये (Pushpak Express) आग लागल्याची अफवा (Rumor) पसरल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी (Passengers) धावत्या रेल्वेतून उड्या (Jump) मारल्या. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसखाली (Karnataka Express) सापडून १२ प्रवाशांचा (Passengers) जागीच मृत्यू (Died on the Spot) झाला. या दुर्घटनेत अनेक जण जखमी (Injured) झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

नेमके काय घडले?

पुष्पक एक्सप्रेसच्या (Pushpak Express Accident) इंजिनच्या (Engine) मागील डब्यातील प्रवाशांना (Passengers) धूर निघत असल्याचे दिसले. त्यातील काहींनी इंजिनच्या दिशेने डोकावून पाहिले असता, इंजिनमधून धूर निघत असल्याचा अंदाज बांधला.

या दरम्यान डी-३ या बोगीतील (Bogie) प्रवाशांनी चैन (Chain) ओढली आणि गाडी परधाडे (Pardhade) स्टेशननजीक असलेल्या पुलाजवळ (Bridge) थांबली. यावेळी घाबरलेले अनेक प्रवासी, ज्यात बहुतांश जनरल बोगीतील (General Bogie) होते, धावत्या गाडीतून खाली उतरले आणि समोरच्या रेल्वे रुळांवर (Railway Tracks) जाऊन उभे राहिले. त्याचवेळी विरुद्ध दिशेने ताशी ११० किमी वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने (Karnataka Express) या प्रवाशांना चिरडले. या अपघातात १२ जण जागीच ठार (Died on the Spot) झाले.

चहा विक्रेत्याची (Tea Seller) अफवा जीवावर बेतली

मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये (Pushpak Express Accident) (क्र. १२५३३) प्रवास करणाऱ्या एका जखमी प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा (Pachora) रेल्वे स्थानक (Railway Station) सोडल्यानंतर काही अंतरावर एका चहा विक्रेत्याने (Tea Seller) गाडीला आग लागल्याची माहिती दिली. यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि त्यांनी घाबरून परधाडे-माहेजीदरम्यान (Pardhade-Maheji) धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या. या दुर्घटनेत होत्याचे नव्हते झाले.

घटनास्थळावरील विदारक दृश्य

अपघातानंतर (Accident) घटनास्थळावर अत्यंत विदारक दृश्य होते. कुणाचे हात, कुणाचे पाय तर कुणाचे अर्धे धड रेल्वेच्या ट्रॅकवर (Railway Track) पडलेले होते. जखमी प्रवासी वेदनेने विव्हळत होते. हा आवाज ऐकून गाडीतील इतर प्रवाशांसह प्रत्यक्षदर्शी नागनाथ बोडखे (बेंगळुरू) (Nagnath Bodkhe) हे देखील खाली उतरले आणि त्यांनी हे भयानक दृश्य पाहिले.

मदतकार्याला (Relief Work) सुरुवात

अपघाताची (Accident) माहिती मिळताच रेल्वे प्रशासन (Railway Administration), पोलीस (Police) आणि वैद्यकीय पथक (Medical Team) घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात (Hospital) हलवण्यात आले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Title : 12 Passengers Killed After Jumping Off Moving Pushpak Express accident Near Jalgaon

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .