बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निलंबित 12 आमदारांची राजभवनाकडे धाव; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीत काय झालं?

मुंबई | ओबीसी आरक्षणावरून विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा रंगली. त्यानंतर प्रस्ताव मोजणीस असताना भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातल्यानं त्यांच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. आमदारांना निलंबित केल्यामुळे भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांचे निलंबनावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर विरोधीपक्षाची बैठक झाली. त्या बैठकीनंतर निलंबित 12 आमदारांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांना झालेल्या प्रकाराची माहिती देऊन तालिका अध्यक्षांच्या निर्णयावर त्यांनी राज्यापालांकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी राज्यपालांना एक लेखी पत्र देखील दिलं आहे.

OBC आरक्षणावर आक्रमक झालेल्या भाजपच्या आमदारांचा आवाज दाबण्यासाठी ठाकरे सरकारने 12 आमदारांना निलंबित केलं. ठाकरे सरकारच्या या दडपशाही निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतल्याचं निलंबित आमदार गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. आता कालप्रमाणे आजदेखील विधिमंडळाचं अधिवेशन जोरदार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये भाजपचे आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, राम सातपुते, नारायण कुचे, हरीश पिंपळे, पराग आळवणी, संजय कुटे, किर्तिकुमार, योगेश सागर यांचा समावेश आहे. या सर्वांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.

थोडक्यात बातम्या-

खासदार नारायण राणेंना दिल्लीतून तातडीने बोलावणं; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राणेंना स्थान?

मोहन भागवत यांच्यावर असदुद्दीन ओवैसींचा पलटवार, म्हणाले…

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

बापरे! गेल्या दोन महिन्यात तब्बल 35 वेळा वाढले पेट्रोलचे दर

“देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांसह भाजपचे सगळे आमदार माझ्या एकट्यावर तुटून पडले”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More