बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अवघ्या 12 वर्षांच्या मुलानं केली आत्महत्या, कारण ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही!

बुलडाणा | आजची तरुण पिढी मोबाईलच्या प्रचंड आहारी गेलेली पाहायला मिळते. फक्त तरुणच नव्हे तर लहान मुलं देखील मोबाईलचा वापर करताना दिसतात. मात्र मोबाईल एखाद्याच्या मृत्यूचं कारण देखील बनू शकतो. बुलडाणामध्ये काळजाला हूरहूर लावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 12 वर्षाच्या मुलाने इतक्या लहान वयात आत्महत्या केल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अशातच कारण समोर येताच सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.

मृत झालेल्या मुलाचं नाव शैलेश इंगळे असं आहे. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालूक्यातील टाकळीपंच येथे रहिवासी असणाऱ्या शेतकरी जोडप्याने आपल्या मुलाला ऑनलाईन अभ्यासाठी अँड्रॉईड मोबाईल खरेदी करुन दिला होता. मात्र दाम्पत्य शेतात गेल्यानंतर मुलं काय करतात याची त्यांना कल्पना नव्हती. शैलेश आणि त्याचा भाऊ आपले आई-वडिल शेतात गेल्यानंतर मोबाईलवर अभ्यास सोडून गेम्स खेळायचे. याकारणाने ते दोघेही मोबाईलच्या प्रचंड आहारी गेले होते.

शनिवारी शैलेश आणि त्याच्या भावामध्ये मोबाईल वरुन वाद पेटला. संध्याकाळी आई वडिल घरी आल्यानंतर दोघा भावांमध्ये मोबाईल वरुन वाद पेटल्याचं त्यांना समजले. मात्र मोठ्या भावाने आपल्याला गेम खेळण्यास मोबाईल न दिल्याच्या रागाने शैलेशने विष पिऊन आत्महत्या केल्याची माहिती शैलेशचे वडिल परमेश्वर इंगळे यांनी दिली.

दरम्यान, शेतात कष्टाने आपल्या रक्ताचे पाणी करुण परमेश्वर इंगळे आणि त्यांची पत्नी नीता इंगळे यांनी आपल्या मुलासाठी मोबाईल खरेदी केला. मात्र हौसेने घेतलेला हाच मोबाईल त्यांच्या मुलाच्या मृत्यूचं कारण बनला. आता इंगळे कुटुंबाकडे त्यांच्या लेकराच्या आठवणी व्यतिरिक्त काही नसल्याचं नीता यांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मंत्रिमंडळाची तीन वाजता महत्त्वाची बैठक, लॅाकडाऊनबद्दल होऊ शकतो ‘हा’ मोठा निर्णय!

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात भयाण वास्तव, कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराला माणसं मिळेना!

बॉलिवूडला मोठा धक्का; ‘या’ एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेता तसेच दिग्दर्शकाचं निधन!

एप्रिल-मे मध्ये होईल कोरोना कहर; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे धक्कादायक निष्कर्ष!

“महाराष्ट्राच्या लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आनंद महिंद्रांनी मोदींच्या लॉकडाऊनमध्ये मात्र थाळ्या पिटल्या”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More