देश

1200 तबलिगी अजूनही गायब; तपासासाठी पोलिस जंग जंग पछाडतायेत

नवी दिल्ली |  निजामुद्दीन तबलिगी मरकज प्रकरणात आणखी एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. दिल्ली पोलिसांसह देशातील अन्य सुरक्षा यंत्रणांच्या कठोर प्रयत्नानंतरही मरकजमधील 1200 मतलिगी अद्याप सापडलेले नाहीत.

फरार असलेले किंबहुना लपून बसलेले 1200 तबलिगी भारतीय आहेत की परदेशी आहेत याविषयी पोलिसांचा तपास सुरू आहे. फरार तबलिगींचा मागोवा घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी उत्तर प्रदेशातील शआमली जिल्ह्यातील कांधलामध्ये मौलाना मोहम्मद साद यांच्या फार्महाऊसवर छापा टाकला.

गुन्हे शाखेच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मारकज येथे 11 ते 13 मार्च या कालावधीत तब्बल 4000 लोक उपस्थित होते. तीन दिवसात मरकजमध्ये आलेल्या 4 हजार जमातींची मरकजच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे.

1800 तबलिगींचा दिल्ली आणि अन् राज्यांतल्या पोलिसांशी संपर्क झाला आहे. मात्र आणखी 1200 तबलिगींचा शोध पोलिस घेत आहेत. दुसरीकडे मौलाना साद आणि मरकजच्या नावाने युपीच्या बँकेत खाते आहेत, त्यासंबंधीही पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या