बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय बोलता? तंबाखू खायचं व्यसन 12 हजार वर्षांपूर्वीचं?

मुंबई | भारतात लहान मुलं ते वयोवृद्ध माणसं अनेकांना तंबाखूचं व्यसन आहे. तंबाखु शरीरासाठी हानिहारक आहे, असं सांगितलं तरी तंबाखूचं व्यसन काही सुटत नाही. काही काही लोकांना तर सकाळी झोपेतुन उठताच तंबाखू खायची सवय आहे. पण तंबाखूचं हे व्यसन आत्ताचंच आहे असं नाही. शेकडो नाही तर गेल्या हजारो वर्षांपासुन लोकांना तंबाखूचं व्यसन असल्याचे पुरावे आता समोर आले आहेत.

उत्तर अमेरिकेतील उटा या ठिकाणी पुरातत्व खात्याच्या एका पथकाला तब्बल 12 हजार वर्षापूर्वीच्या तंबाखूच्या बिया सापडल्या आहेत. उटा या ठिकाणच्या ग्रेट सॉल्ट डेझर्ट या भागात 12 हजार वर्षापूर्वीच्या तंबाखूचे पुरावे सापडले आहेत. आता या पुराव्यावरून हे सिद्ध झालं की माणसाची तंबाखू खायची सवय ही काही नवीन नाही.

यापूर्वी देखील एकदा तंबाखू वापराचे 3300 वर्षांपूर्वीचे पुरावे सापडले होते. त्यावेळी अमेरिकेच्या अलबामामध्ये एक स्मोकींग पाईप सापडली होती आणि आता तर चक्क 12 हजार वर्षापूर्वीच्या तंबाखूच्या बिया सापडल्या आहेत. वैद्यकीय कारणांसाठीही तंबाखूचा वापर केला जातो. याशिवाय धुम्रपान, नशा अशा अनेक गोष्टींसाठी तंबाखुचा वापर केला जातो.

त्यामुळे तंबाखू न खाण्याबद्दल सांगितलं जातं. पण तरीही भारतात अगदी गल्ली बोळात लोकं तंबाखू चोळत थांबलेले दिसतात आणि त्यात तंबाखू खायचं हे व्यसन हजारो वर्षांपूर्वीचं असल्याचं आता सिद्ध झालं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

मुकेश अंबानींची ‘या’ परदेशी कंपनीत मोठी गुंतवणूक; भारतीय उद्योगक्षेत्राला होणार फायदा

“फडणवीस मुख्यमंत्री असताना खुट्ट झालं तरी बोंबाबोंब व्हायची”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंचा पुन्हा आक्रमक पवित्रा

देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत चढ-उतार सुरूच, वाचा आकडेवारी

संजय राऊतांचा बैठकींचा सपाटा; पुण्यात मोर्चेबांधणीला केली सुरूवात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More