Mantralay - धक्कादायक! आणखी एका शेतकऱ्याचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न
- महाराष्ट्र, मुंबई

धक्कादायक! आणखी एका शेतकऱ्याचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई | धर्मा पाटील यांनी मंत्रालयाच्या दारात आत्महत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच त्याची पुनरावृत्ती होता होता टळली. पोलिसांनी याप्रकरणी मारुती धावरे या शेतकरी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. 

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर तपासणी करत असताना पोलिसांना मारुतीकडे कीटकनाशकाची बाटली आढळली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलंय. तो सोलापूरच्या सांगलीचा रहिवासी आहे. 

शेतातील ऊस घेवून जाण्यासाठी रस्ता नसल्याने उभे पीक जाळावे लागले. सरकारी यंत्रणेकडे दाद मागूनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे मारुती धर्मा पाटील यांचा मार्ग अवलंबणार होता, असं कळतंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा