Shivaji Maharaj1 - शिवजयंतीनिमित्त देशभरात उत्साह, विविध कार्यक्रमांचं आयोजन
- देश

शिवजयंतीनिमित्त देशभरात उत्साह, विविध कार्यक्रमांचं आयोजन

मुंबई | आज 19 फेब्रुवारी अर्थात शिवजयंती… राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आज शिवजयंतीचा उत्साह पहायला मिळतोय. शिवप्रेमी आपापल्या परीने आपल्या राजाला मानवंदना देण्याचा प्रयत्न करत आहेत. 

मध्यरात्री बाराचा ठोका पडताच ‘शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी शिवप्रेमींनी आसमंत दणाणून सोडला. शिवज्योत घेऊन अनेक मावळे सकाळी आपल्या गावी पोहोचल्यानंतर गावातही शिवप्रेमींनी जल्लोष केला. 

दरम्यान, किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. याशिवाय आजपासून राजधानी दिल्लीतही शाही शिवसोहळा सुरु होणार आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा