Narendra Modi Rahul Gandhi Shivjayanti - नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा
- देश

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली | शिवजयंतीनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. आतापर्यंतच्या भाषणांमध्ये शिवाजी महाराजांचा केलेले उल्लेख एकत्र करुन हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. 

तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची चक्क मराठीतून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून एकात्मता व सौहार्दतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा!, असं त्यांनी म्हटलंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा