Sharad pawar Narendra Modi - पवार खरंच मोदींचे गुरु आहेत? नेमकं काय म्हणाले शरद पवार???
- पुणे, महाराष्ट्र

पवार खरंच मोदींचे गुरु आहेत? नेमकं काय म्हणाले शरद पवार???

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी शरद पवार आपले राजकीय गुरु असल्याचं, आपण त्यांची करंगळी धरुन राजकारणात आल्याचं सांगतात, याबद्दल राज ठाकरे यांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला. शरद पवार यांनी अत्यंत मिश्कील शब्दात या प्रश्नाला उत्तर दिलं. 

पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी दिल्लीला बैठकीसाठी यायचे तेव्हा माझ्या घरी यायचे. मात्र पंतप्रधान झाल्यावर त्यांनी जे वक्तव्य केलं ते साफ खोटं आहे. कारण माझी करंगळी मला कधीच त्यांच्या हातात सापडली नाही, असं शरद पवार म्हणाले. 

शरद पवार यांच्या उत्तराने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. नरेंद्र मोदी खोटं बोलत असल्याचंही शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा