Sharad Pawar Raj Thackeray 4 - साहेब ते क्षेत्र आपल्याकडेच; राज ठाकरेंनीही केलं मान्य
- पुणे, महाराष्ट्र

साहेब ते क्षेत्र आपल्याकडेच; राज ठाकरेंनीही केलं मान्य

पुणे | आजही मी महाराष्ट्र राज्य कुस्तीचा अध्यक्ष आहे, असं शरद पवार म्हणाले. तेव्हा साहेब… ते क्षेत्र आपल्याकडेच, असं राज ठाकरे यांनी मान्य केलं. उपस्थितांनी यावेळी टाळ्यांचा कडकडाट केला. 

तुमची पंतप्रधान बनण्याची महत्वाकांक्षा होती, असं मी म्हणणार नाही. आजही आहे. मराठी माणूस पंतप्रधान झाला तर मला आवडेल. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशात पोहोचण्यासाठी तुम्ही क्रिकेट निवडलं का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला होता. 

मला अनेक खेळांबद्दल आस्था आहे. क्रिकेट त्यापैकी एक, महाराष्ट्रातल्या कुस्तीचा मी अध्यक्ष आहे. कबड्डी माझ्याच कारकीर्दीत राष्ट्रीय पातळीवर गेला. आयपीएल माझ्या काळात सुरु झालं, असंही शरद पवार यावेळी म्हणाले. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा