बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बारावीची परीक्षा आजपासून सुरु; राज्यभरातून 15 लाख विद्यार्थ्यी भविष्य आजमावणार

पुणे | राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा आजपासून सुरु आहे. राज्यभरातून तब्बल 15 लाख विद्यार्थी बारावीची परिक्षेसाठी बसले आहेत. 18 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत घेतली जाणार आहे.

पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, मुंबई, औरंगाबाद, लातूर, अमरावती आणि कोकण या 9 विभागीय मंडळातून 15 लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी 9 विभागीय मंडळातून एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यंनी नोंदणी केली आहे. यामध्ये 8 लाख 43 हजार 552 विद्यार्थी तर 6 लाख 61 हजार 325 विद्यार्थींनी आहेत, अशी माहिती बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली आहे.

राज्यभरात एकूण 3 हजार 036 परीक्षा केंद्र आहेत. यंदाच्या बारावीच्या परीक्षेसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, कला आणि विज्ञान या विषयांच्या प्रश्नपत्रिकेत बदल केल्याची माहिती काळे यांनी आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने अनेक पेपरमध्ये एक दिवसांची सुट्टी दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सरकार इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करणार नाही- बच्चू कडू

‘शिवाजीचे उदात्तीकरण: पड्यामागचे वास्तव’ पुस्तकावर बंदी घाला; भाजपची मागणी

महत्वाच्या बातम्या-

“एसआयटी चौकशीसाठी कायदेविषयक सल्ला घेणार”

फडणवीसांच्या #हिंमतअसेलतर आव्हानाची सोशल मीडियात उडवली जातेय खिल्ली

बाबांनो, लोटांगण घालतो पण आता तरी गप बसा- इंदोरीकर महाराज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More