Top News देश

बारावीच्या निकालात ‘या’ मुलीने मिळवलेले गुण वाचून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल!

लखनऊ | सीबीएससीचा बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात लखनऊच्या दिव्यांशी जैननं पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. दिव्यांशीला ६०० पैकी ६०० गुण मिळाले आहेत, अर्थात तिला प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.

दिव्यांशी लखनऊच्या नवयुग रेडियन्स पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे. तिने इंग्रजी, संस्कृत, इतिहास, भूगोल, इन्शोरेन्स आणि अर्थशास्त्र विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहे.

तिच्या या यशानं तिच्या घरात तसेच परिसरात आनंदाचं वातावरण आहे. नातेवाईक तसेच शिक्षकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे कुठलाही क्लास न लावता तिनं हे यश संपादन केलं आहे. तिच्या घरच्यांनाही ती पैकीच्या पैकी गुण मिळवेल, अशी अपेक्षा नव्हती.

दिव्यांशीला बीए ऑनर्स शिकायचे आहे. आपली मुलगी भविष्यातही अशाच प्रकारचं यश मिळवेल, अशी आशा तिच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, बारावीच्या निकालात एकूण 88.78 टक्के विद्यार्थी उर्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 92.15 टक्के विद्यार्थीनी तर 86.19 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘येत्या दोन महिन्यात परीक्षा घेणं अशक्य’; परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी, बघू ते मुलाखत देतात का?- संजय राऊत

धक्कादायक! भाजप मंत्र्याच्या मुलाला रोखल्यामुळे पोलिस महिलेला द्यावा लागला राजीनामा

‘गुगल भारतात इतक्या हजार कोटींची गुंतवणूक करणार’; सुंदर पिचई यांनी केली मोठी घोषणा

“राजस्थानमध्ये उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीला राहुल गांधीच जबाबदार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या