फेब्रुवारी 2025 मध्ये तब्बल 13 दिवस बँका बंद, पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी !

Bank Holiday List

Bank Holidays | फेब्रुवारी (February) महिना अवघ्या २८ दिवसांचा (28 Days) असला तरी, या महिन्यात बँक कर्मचाऱ्यांना (Bank Employees) तब्बल १३ दिवस सुट्टीचा (Bank Holidays) आनंद मिळणार आहे.

बँकांना विविध सणांमुळे (Festivals) १३ दिवस सुट्ट्या आहेत. या सुट्ट्या प्रत्येक राज्यानुसार (State-wise) बदलतात. त्यामुळे तुम्ही जर बँकेशी संबंधित कामांचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

फेब्रुवारी २०२५ मध्ये विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक सण, तसेच धार्मिक कार्यक्रमांमुळे (Religious Events) १३ दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. जर तुम्हाला बँकेसंबंधी कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल, तर या सुट्ट्यांची माहिती वेळेतच जाणून घेऊन तुमचे काम आधीच नियोजित करा, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) बँकेच्या सुट्ट्यांची यादी आधीच जाहीर करते. शिवाय तुम्ही जवळच्या शाखेतूनही सुट्ट्यांची माहिती जाणून घेऊ शकता.

फेब्रुवारी महिन्यात देशभरातील विविध राज्यांमध्ये बँका ८ दिवस बंद राहतील. याशिवाय, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी आणि रविवारीही बँका बंद राहतील. बँका बंद असल्या तरीही तुम्ही डिजिटल बँकिंग सेवांचा (Digital Banking Services) वापर सहज करू शकता. तुम्ही पैसे ट्रान्सफर (Money Transfer), बिल भरणे (Bill Payment), किंवा बँक बॅलन्स (Bank Balance) तपासणे यांसारख्या सेवा डिजिटल माध्यमातून पूर्ण करू शकता.

आर्थिक व्यवहारांचे नियोजन करा

फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांचा विचार करून तुमचे आर्थिक व्यवहार आधीच पूर्ण करा. यामुळे तुमच्या वेळेची बचत होईल आणि कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. सलग दोन दिवस सुट्ट्यांमुळे ATM मध्ये खडखडाट जाणवू शकतो. त्यामुळे तुमच्याकडे थोडे पैसे काढून ठेवा, नाहीतर बऱ्याचदा सर्व्हर डाऊन (Server Down) असेल तर पेमेंट करताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्याचेही नियोजन आधीच करा. (Bank Holidays)

फेब्रुवारी २०२५ मधील सुट्ट्यांची संपूर्ण यादी:

रविवार, २ फेब्रुवारी: साप्ताहिक सुट्टी
सोमवार, ३ फेब्रुवारी: सरस्वती पूजेनिमित्त (Saraswati Puja) अगरतळामध्ये (Agartala) बँका बंद.
शनिवार, ८ फेब्रुवारी: दुसरा शनिवार
रविवार, ९ फेब्रुवारी: दुसरा रविवार
मंगळवार, ११ फेब्रुवारी: थाई पुसम सणानिमित्त (Thai Pusam Festival) चेन्नईमध्ये (Chennai) बँका बंद.
बुधवार, १२ फेब्रुवारी: श्री रविदास जयंतीनिमित्त (Shri Ravidas Jayanti) शिमलामध्ये (Shimla) बँका बंद.
शनिवार, १५ फेब्रुवारी: लोई-नागाई-नी सणासाठी (Lui-Ngai-Ni Festival) इंफाळमध्ये (Imphal) बँका बंद.
रविवार, १६ फेब्रुवारी: साप्ताहिक सुट्टी
बुधवार, १९ फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) बेलापूर (Belapur), मुंबई (Mumbai), आणि नागपूरमध्ये (Nagpur) बँका बंद.
गुरुवार, २० फेब्रुवारी: राज्य दिनानिमित्त (State Day) ईटानगर (Itanagar) आणि आइजोलमध्ये (Aizawl) बँका बंद.
शनिवार, २२ फेब्रुवारी: चौथा शनिवार
रविवार, २३ फेब्रुवारी: चौथा रविवार
बुधवार, २६ फेब्रुवारी: महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) अहमदाबाद (Ahmedabad), हैदराबाद (Hyderabad), जयपूर (Jaipur), लखनऊ (Lucknow), मुंबई, रायपूर (Raipur), शिमला (Shimla), श्रीनगर (Srinagar), आणि तिरुवनंतपुरमसह (Thiruvananthapuram) अनेक शहरांतील बँका बंद. (Bank Holidays)

Title:  13 days bank holidays in february 2025 check list

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .