बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिमाचल प्रदेशमध्ये दरड कोसळून 13 जणांचा मृत्यू; मोदींकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

नवी दिल्ली | मुसळधार पावसाने सगळीकडे खळबळ माजवली आहे. अतिवृष्टीमुळे सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच आता हिमाचल प्रदेशातून दरड कोसळल्याची भीषण घटना समोर आलीये. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे.

हिमाचल प्रदेशातील किन्नोरमधील नॅशनल हायवेवर दरड कोसळली असून या दुर्घटनेत 13 जणांना सुखरुप वाचवण्यात आलं असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना आणि दुखापत झालेल्या लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक मदत जाहीर केली आहे.

या भीषण घटनेत गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांकडून 2 लाख रुपये मिळणार आहेत तर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. या ठिकाणी अजूनही दरड कोसळत असल्यानं काही लोक तिथे अडकले आहेत.

दरम्यान, ही घटना काल दुपारी दोनच्या सुमारास घडली. या दुर्घटनेनंतर तेथील परिसरात खळबळ उडाली असून परिसरातील रस्ताही उद्ध्वस्त झाला आहे. ही घटना घडल्याचं समजताच एनडीआरएफचं पथक आणि भारतीय सैन्याचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि मदत कार्याला सुरुवात केली.

थोडक्यात बातम्या –

“आपण भाग्यवान म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सवर आपला स्वतःचा फोटो आहे”

सेक्स व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ; भाजपचा बडा नेता अडचणीत!

मायग्रेनने ग्रस्त असलेल्या लोकांनी ‘हे’ खाऊ नये!

पीएफ खातेदारांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे जमा होणार

“गंगा नदीच्या पाण्यात कोरोना व्हायरस टीकू शकत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More