नवी दिल्ली | हरियाणा येथे एका तरुणाला 13 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनवण्यात आली होती. या तरुणाचं नाव अमित मिश्रा असून हा एक साॅफ्टवेअर इंजिनिअर आहे. मात्र काही वर्षांपुर्वी त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर हरियाणातील ग्रुरुग्राममधील तुरुंगात त्याला 13 महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुणावण्यात आली होती.
13 महिन्यांच्या तुरुंगवासात आपली शिक्षा भोगत असताना या तरुणाने एक साॅफ्टवेअर तयार केला आहे. या साॅफ्टवेअरला ‘फिनिक्स’ असं नाव देण्यात आलं असून हे साॅफ्टवेअर तुरुंगाचं व्यवस्थापन सुधरवण्या संदर्भातील आहे. एक वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर आता अमितची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सोमवारी या साॅफ्टवेअरला पाहून सर्वोच्च न्यायलय आणि इतर वकिलांनाही धक्का बसला आहे. तसेच सर्वोच्च न्यायलयाने अमितचं कौतुक केलं असून हे साॅफ्टवेअर तुरुंगामधील सुधरांसाठी उपयोगी ठरु शकतं. आणि त्यामुळे देशातील अनेक राज्यांनी हा साॅफ्टवेअर पहावा, असा सल्ला सर्वोच्च न्यायलयानं तसेच न्या. संजय किशन कौल आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या द्विसदस्यीय खंडपिठाने दिला आहे.
या साॅफ्टवेअरच्या मदतीने तुरुंगातील कैदी काय करतो, कसा राहतो, इतरांशी कसा वागतो, अशा अनेक गोष्टींची नोंद ठेवण्यात येऊ शकते. हे साॅफ्टवेअर सध्या हरियाणामधील 19 जिल्ह्यांमध्ये वापरला जात आहे. तसेच अमितने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानमधील 38, उत्तर प्रदेशातील 31 तर हिमाचल प्रदेशातील 13 जिल्ह्यांमध्ये ह्या साॅफ्टवेअरची प्रशासनाकडून मदत घेतली जात आहे.
थोडक्यात बातम्या-
“एकाला एक दुसऱ्याला दुसरा न्याय नको, धनंजय मुंडेंचाही राजीनामा घ्या”
ते सगळ्यात मोठे गुंड; भर भाषणात हर्षवर्धन जाधवांच्या मैत्रिणीनं केलेल्या आरोपांनी खळबळ
धक्कादायक! भाजपच्या ‘या’ खासदाराचं कोरोनामुळे निधन
कार्तिक आर्यन समोर येताच तिने केलं असं काही की…; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद
Comments are closed.