बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ महापालिकेतील तब्बल 1300 कर्मचारी कोरोनाबाधित; 27 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

नाशिक | संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेणारा कोरोना व्हायरस हा गेल्या दीड वर्षांपासून देशभरासह महाराष्ट्रातही हाहाकार माजवत आहे. अशातच दोन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं असतानाच हळूहळू महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

नाशिक महानगरपालिकेत गेल्या 14 महिन्यात तब्बल 1 हजार 300 महापालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. महापालिकेतील कर्मचारी काम करत असताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने आतापर्यंत तब्बल 27 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे अनेकांची कुटुंबं उध्वस्त झाली आहेत. तसेच आरोग्य विभागातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांना नाशिक महापालिकेत कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हळूहळू रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी पूर्णपणे संकट अद्याप टळलेलं नाही, असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

नाशिक परिसरातील पर्यटनस्थळांवर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने पोलिसही कारवाईला सज्ज झाले आहेत आणि पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक आता तरी नियमांचं काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांची प्रकृती नाजूक; डॉक्टर म्हणतात…

पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांची कडेकोट नाकाबंदी

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल करा; पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आक्रमक

लसीकरण केल्यानंतर कोरोना होणार का?; संशोधनातून ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

पंतप्रधान मोदी करणार काश्मिरी नेत्यांसोबत बैठक; बैठकीपुर्वीच पाकिस्तानात चिंतेचं वातावरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More