बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विरोधकांच्या गोंधळामुळे केवळ 18 तास झालं संसदेचं कामकाज; इतक्या कोटींचं नुकसान

नवी दिल्ली | सध्या दिल्लीत संसदेचं पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. 19 जुलै ते 13 ऑगस्टच्या दरम्यान हे अधिवेशन होत आहे. आता या अधिवेशनाचे 15 दिवस पुर्ण होत आले आहेत, तरी देखील संसदेचं कामकाज अद्याप ठप्पच आहे. पेगॅससच्या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. काँग्रेस आणि अन्य 14 पक्षांच्या खासदारांनी गेली कित्येक दिवस सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे संसदेचे तब्बल 133 कोटी वाया गेल्याची माहिती समोर आली आहे.

पेगॅससच्या मुद्द्यावरून विरोधीपक्षाने आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना धारेवर धरलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचबरोबर सरकारने या प्रकरणावर चर्चा करावी आणि या प्रकरणाची चौकशी जेपीसीमार्फत व्हावी, अशी मागणी देखील विरोधी पक्षाने केली होती. त्यावरून संसदेचं कामकाज ठप्प झालं आहे.

मागील दोन आठवड्यांत लोकसभेच्या निर्धारित करण्यात आलेल्या 54 तासांपैकी लोकसभेत केवळ 7 तास कामकाज झालं आह. तर दुसरीकडे राज्यसभेत 53 तासांपैकी केवळ 11 तास कामकाज झालं. या संपुर्ण अधिवेशनाच्या काळात 107 तासांपैकी केवळ 18 तास कामकाज चाललं. त्यामुळे किमान 89 तास संसदेत गोंधळाची स्थिती होती.

दरम्यान, संसदेचे कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी आणि राज्यसभेचे सभागृहनेते पियुष गोयल यांनी विरोधकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांना यश आलं नाही. त्यानंतर आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या खांद्यावर विरोधकांशी चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

चक दे इंडिया ! भारतीय पुरूष हाॅकी संघाने रचला इतिहास; 49 वर्षानंतर उपांत्य फेरीत धडक

शिक्षणमहर्षी आणि माजी आमदार आलुरे गुरूजी यांचं निधन!

आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलं तर सोडत नाही- देवेंद्र फडणवीस

“फक्त 15 रूपयात नवा सातबारा, आता जमिनीच्या खोट्या नोंदीही करता येणार नाही”

“सेना भवनापर्यंत स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More