महाराष्ट्र मुंबई

टाळेबंदी शिथील केल्यानंतर मिळाले जवळपास 13500 उद्योगांना परवाने

मुंबई | उद्योग विभागाने टाळेबंदीनंतरनंतर काही अटी व शर्थीसह उद्योग सुरू करण्यासाठी परवाने जारी केले आहेत. 20 ते 27 एप्रिल दरम्यान 13 हजार 448 उद्योगांना परवाने जारी केल्याचे उद्योग विभागाने सांगितले आहे. केंद्र शासनाने 20 एप्रिलपासून लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केले व काही अटी शर्थीवर उद्योग सुरू करण्यासाठी परवानी दिली आहे.

केंद्राच्या मार्गदर्शक सूचना डोळ्यासमोर ठेवून उद्योग विभागाने उद्योग सुरू करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली आहे. परवाने मिळवण्यासाठी आतापर्यंत 25 हजार अर्ज दाखल झाले असून अटी व शथीर्चे पालन करणाऱ्या सुमारे 13 हजार 448 उद्योगांना परवाने देण्यात आले आहेत.

उद्योग सुरू करताना सामाजिक अंतर राखणे, कामगारांची कंपनी किंवा कारखान्याच्या आवारात राहण्याची सोय करणे, कामगारांचे दळणवळण टाळणे आदी सूचनांचे पालन करणाऱ्यांनाच परवाने दिले जात आहेत. वरील सूचनांचे पालन करण्याची तयारी असलेल्या उद्योगांना आतापर्यंत परवानगी दिली जात आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पनवेल, यासह बारा महानगरपालिका क्षेत्रात जिथे रेड झोन आहे, त्या ठिकाणी अद्याप उद्योग सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. उद्योग सुरू होणे काळाजी गरज आहे. यामुळे उद्योगचक्राला गती मिळेल, शिवाय कामगारांना रोजगार मिळेल, असा आशावाद उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“दात कोरून देश चालवायचा असेल तर अर्थमंत्र्यांची गरज काय?”

“यापुढे राज्य सरकारांना सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय सेवा आणि शिक्षणावर सर्वाधिक खर्च करावा लागेल”

महत्वाच्या बातम्या-

हॉटस्पॉट वगळता 4 मे रोजी लॉकडाऊन उठणार? रस्ते, रेल्वे अन् विमान वाहतुक मात्र बंद राहणार?

“नागरिकांनो घाबरू नका, आतापर्यंत 1282 कोरोनाबाधित ठणठणीत बरे झालेत!”

राजस्थानमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 100 एसटी बस पाठवणार- परिवहन मंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या