साराहसह 14 अॅपवर गुगलने घातली बंदी

मुंबई | साराह नावाच्या अॅपने मध्यंतरी जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. मात्र या अॅपसह तब्बल 14 अॅपवर गुगलने बंदी घातलीय. अर्थात गुगल प्ले स्टोअरवरुन ही अॅप इन्स्टॉल करता येणार नाहीत. 

Sarahah बरोबरच TubeMate, CM Installer, TV Portal, AdAway, Grooveshark, PSX4Droid, Rush Poker, Amazon UnderGround, Viper4Android, Popcorn Time, F-Droid, Xposed Framework, Lucky Patcher या अॅपवर बंदी घालण्यात आलीय. 

 

सुरक्षेच्या कारणामुळे गुगलने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. काही नेटीझन्सनी मात्र गुगलच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.